Friday, December 19, 2008

वडील हरवतात तेंव्हा...

नागपूर, १९ डिसेंबर २००८ . हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला येण्याचे हे ६वे वर्ष. रणजितदादा नेहमी सासरवाडीत वाड्यावर महाल येथे राहतात,मी आमदार निवास रूम नं.३०४ येथे राहतो.नागपूर येथेही मित्र झाले.अरूण व धनंजय ठाकरे,नगरसेवक राजू माटे,उद्योगपती हर्ष अगरवाल असे चांगल्या मित्रांचा संच झाला. आज नेहमीप्रमाणे दादांबरोबर विधानभवन येथे गाडीतून जाताना वर्तमानपत्र वाचताना मन सून्न झाले. बातमीचे सिर्षक होते .... वडील हरवतात तेंव्हा... मुंबईतील एका पोलीस कुटुंबातील ही गोष्ट आहे. लहान मुलीबरोबर ड्यूटीवरून घरी आल्यानंतर वडील रोज खेळायचे.कधी शिवनापाणी तर कधी लपाछपी.सुट्टीच्या दिवशी बागेत भेळपूरीचा बेत.लपाछपी मध्ये वडील लवकर सापडले नाही की,मुलगी आईकडे जाऊन रडायची .मग आई मुलीला समजवायची, बाबा हरवले आहेत , थोडे थांब , मग ते स्वतहाच तुझे समोर येतील. अश्या सुखी कुटुंबातील बाबा अचानक २६ नोव्हेंबर च्या रात्री नंतर घरी आलेच नाहीत . सी.एस्.टी.स्टशन वरील अतिरेकी हल्ल्यात ते शहीद झाले. आजही त्या घरातील छोटी मुलगी बाबांच्या आठवणीने रडते,तेंव्हा आई सांगते बाबा हरवले आहेत , थोडे थांब,मग ते स्वतहाच तूझे समोर येतील....दिवसांमागून दिवस गेले ... पण बाबा काही आलेच नाहीत...अन् छोटी छकुली अजूनही, कधीही न येणा-या बाबांची वाट पाहतेय... प्रत्येक घटना समाजमनावर आपला ठसा उमटवतात...अशा १९५ शहीद व्यक्तींचे घरचे त्यांची वाट पहातयेत. आपत्ती ही कधीही सांगून येत नसते, म्हणूनच कर्त्या माणसाने प्रिय व्यक्तिंच्या सुखी जीवनाची काळजी घेणेचे पहिले कर्त्व्य आहे. आशा संकटकाळी शहीदांच्या कुटुंबियांच्या योगक्षेमासाठी भारतिय जीवन आयुर्विमा ही संस्था पुढे आली. शहिद करकरे व शहिद कामठे व इतर सर्व शहिद झालेल्याच्या कुटुंबियांना घरपोच चेक दिले. देश उभारणी बरोबर सेवा हे धेय्य असणा-या या संस्थेने सेवा करून शहिदांना श्रध्दांजली वाहीली. सततची सावधानता हीच खरी सूरक्षा व पहिले प्राधान्य सुरक्षितता हीच भेट कुटुंबातील प्रियजनांना देणे कर्त्व्य आहे. विमा घेणे ही प्रत्येकाचे पहिले काम या धावपळीच्या युगात झाले आहे.

समाजाच्या शाळेतील विद्यार्थी...

नागपूर. १९ डिसेंबर . आज मा.रणजितदादा शासकीय विमानाने मुंबईला रवाना झाले, मग आमदार निवास रूम नं ३०४ मध्ये आलो,मग सुरू झाली चिंतनाची बैठक.विचार हे जीवंतपणाचे लक्षण व आयुष्याचा वेग व आवेग याबद्दल मनात काहूर माजते. मित्रांची संगत मला घडवित असल्याचा भास होतो. संपर्कात येणारा प्रत्येक जण माझा शिक्षक असतो व मी विद्यार्थी...
नेहमी राजमार्गाने प्रवास करावा,कारण राजमार्गावर वाटमारी होत नाही.
सततची सावधानता हीच खरी सुरक्षितता. असे विचार आबा कदम या मित्राचे .
आई नेहमी म्हणते, समाजाच्या शाळेत पदवी घेतली तरच तु खरा पदवीधर, अन्यथा तूझी इंजीनिअरींगची कागदी पदवी कवडीमोल आहे. जीवनाचा प्रवास हा शिक्षण व प्रशिक्षणाचा आहे. २६,२७,२८ नोव्हे च्या अतिरेकी हल्ल्यानंतर राजकीय युध्द झाले, अतिरेकीपणाने बोलणारे हरले ( अंगात क्षमता असूनही ) या प्रसंगातून नेहमी विवेकपूर्ण बोलावे हे शिकलो. मौन हेच मोठे शस्त्र आहे,याचा प्रत्यय आला.नेहमी आनंदी रहावे व संतूलित असावे. नियंत्रीत भावना हेच आयूष्याच्या यशाचे गमक आहे,याचा पावलोपावली जाणवते. काल लोकसत्तामध्ये लेख वाचला.सुंदर विवेचन, काही महत्वपूर्ण ओळी मित्रांसाठी लिहीत आहे........एखाद्या विषयाची पूर्ण माहीती होत नाही तोपर्यंत त्या विषयावर बोलण्याचे व प्रतिक्रीया देण्याचे कटाक्षाने टाळावे.इतरांशी संपर्क साधून विचारांची देवाणघेवाण करणे,चर्चा करणे,सुसंवाद साधने यामुळे आपल्या विचारांच्या कक्षा व्यापक होतात.एक महत्वाचे - तुमचे विचार जसे तुम्हाला प्रिय आहेत,अगदी तसेच इतरांना देखिल त्यांचे विचार प्रिय असतात,म्हणून त्यांचाही नेहमी आदर करा.याचा अर्थ वैचारीक मतभेद असू नयेत,असे नव्हे तर वाद टाळून संवाद निर्माण करण्याची कला अवगत करा. प्रत्येक संवाद हा संवादच राहिला पाहिजे. विचारांचा सामना विचारांनीच करायला शिकणे हा जीवनाचा पहिला धडा.
समाज व जीवन नेहमी बदलत राहणार.रोज एक नवीन प्रश्न व रोज एक नवीन संघर्ष.एका प्रश्नाचे उत्तर सापडले की दुसरा प्रश्न उभा.प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असणारच. .....जगाला प्रकाश देण्यासाठी वातीला जळावेच लागते,नव्हे ते तिचे कामच आहे, ते काम तिने स्वखुशीने स्वीकारले आहे.तुम्हीच ठरवा की,तुम्हाला दिव्याची वात होउन जगाला प्रकाश द्यायचा की,दिव्याखालचा अंधार.निर्णय तुमचा आहे. माझा निर्णय प्रकाश देण्याचा. चला प्रकाशाचे वाटेकरू होउ, परिवर्तनाचे अंगबनून डोळे मिटण्याआधी परिवर्तन घडवूया.हल्ली मला शुक्राची चांदणी फार चमकताना दिसते, परिवर्तनासाठी व समृध्दीची नांदी आहे,याची खात्रीच आहे. ...फिर मिलेंगे...मिलते रहेंगे...परिवर्तन का अंग बनेंगे,और परिवर्तन करेंगे...

Thursday, December 18, 2008

लक्षवेधी सुचना,बीडी उद्योग कामगारांचे आंदोलन...

धुम्रपान कायद्यातून बिडी उद्योगाला सवलत द्यावी- आ.रणजितसिंह मोहिते-पाटील
नागपूर, दि.१८डिसे. आज विधानपरिषदेमध्ये धुम्रपानविरोधी कायद्यातून बिडी उद्योगातील कामगारांसाठी वेष्टन व जाहिरातीमधून सूट देण्याची मागणी रणजितसिंहांनी केली. ते म्हणाले, केंद्र शासनाने धुम्रपान बंदी विधेयक सन २००३ मध्ये आणले,या विधेयका अन्वये प्रत्येक बीडीवर निकोटीन व टार चे प्रमाण लिहणे,बीडी बंडलच्या ४० टक्के भागावर वैधानिक इशारा व कँन्सर रूग्णाचे चित्र लावणे बंधनकारक केले आहे, परंतू प्रँक्टीकली हे करणे शक्य नसल्याने बीडी कारखानदारांनी सोलापूर मधिल कामगारांना कपातीच्या नोटीसा दिल्या व कामगार आयुक्तांना परवानगीसाठी अर्ज केला, त्यामुळे ६५००० महिलांनी कामगार आयुक्त,सोलापूर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला, राज्यातील दीड लाख आदिवासी व महिलांना रोजगार देणारा हा घरखेप उद्योग बंद केल्यावर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे संकट उभे राहणार आहे, म्हणून राज्य शासनाने हस्तक्षेप करून हा उद्योग वाचवावा. यावर कामगार मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, केंद्र शासनाने ३१.०५.२००९ पर्यंत म्हणजे ६ महिने अंमलबजावणी पुढे ढकलली असून, येत्या ६ महिन्याच्या पूर्वी लोकप्रतिनिधींना घेऊन मा.पंतप्रधानांना भेटून बीडी उद्यागाला संरक्षण देम्याची मागणी करण्यात येईल.

विधान परिषदेतील मा.आ.रणजितदादांचे कामकाज...

नागपूर ,दि.१८डिसें२००८ , आज मा.आ.रणजितसिंह मोहिते-पाटील मोहिते-पाटील यांनी राज्यातील विविध प्रश्न उपस्थित केले.
१.कापुस एकाधिकार योजनेच्या तत्कालीन नियमानुसार राज्यातील शेतक-यांना शासनास प्राप्त झालेला नफा बोनस रूपाने वाटण्याबाबत ऱणजितसिंहांनी प्रश्न विचारला की, सन २००५-०६व २००६-०७ या दोन्ही आर्थिक वर्षात पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाच्या विक्रीतून २५० कोटी रू फायदा पणन महासंघाने शेतक-यांना २००८ मध्येही आजपर्यंत वाटप का केला नाही व किती कालावधित शासन हा नफा वाटप करणार आहे , या प्रश्नाला उत्तर देताना पणन मंत्री ना.मदन पाटील यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले की, सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येईल व शेतक-यांना नफा वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करू.
२. विधी मंडळाच्या सन २००८ मधिल हिवाळी अधिवेशना मध्ये सादर केलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेमध्ये भाग घेउन आ.रणजितसिंहांनी नगरविकास विभागाकडे सोलापूर मनपा साठी हद्दवाढ भागामध्ये नागरी सोई-सुविधा पुरविण्यासाठी १७२ कोटी रू. विकास निधी द्यावा. केंद्र शासनाच्या लघु व मध्यम शहरांच्या विकास योजनेतून निधी मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवून २ वर्ष झाले, निधी मंजूरीचे पत्र मनपाला मिळाले परंतू निधी मात्र अद्यापही मिळाला नाही,म्हणून शासनाने पुढाकार घेऊन स्वताच्या हिश्श्याचा निधी द्यावा व केंद्र शासनाकडूनही निधी मिळवून द्यावा तरच सोलापूरच्या हद्दवाढ भागात नागरी सुविधा देणे शक्य होईल, यावर नगरविकास मंत्री व मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाचा निधी देऊन केंद्राचा निधी मिळवून देण्यासाठी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

Monday, December 1, 2008

अखेर गिरीश अवघडे, या मित्रामुळे ब्लाँग लिहणे आज १ डिसेंबर पासून सुरू झाले.
एक नियतीशी लढणा-या सामान्य माणसाचे सामान्य माणसांसाठी समृध्द महाराष्ट्र करण्यासाठी मदत,मार्गदर्शन व सहभागी व्हा माझ्याबरोबर आपले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी, टाका पहिले पाउल, या सामील व्हा.