नागपूर, १९ डिसेंबर २००८ . हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला येण्याचे हे ६वे वर्ष. रणजितदादा नेहमी सासरवाडीत वाड्यावर महाल येथे राहतात,मी आमदार निवास रूम नं.३०४ येथे राहतो.नागपूर येथेही मित्र झाले.अरूण व धनंजय ठाकरे,नगरसेवक राजू माटे,उद्योगपती हर्ष अगरवाल असे चांगल्या मित्रांचा संच झाला. आज नेहमीप्रमाणे दादांबरोबर विधानभवन येथे गाडीतून जाताना वर्तमानपत्र वाचताना मन सून्न झाले. बातमीचे सिर्षक होते .... वडील हरवतात तेंव्हा... मुंबईतील एका पोलीस कुटुंबातील ही गोष्ट आहे. लहान मुलीबरोबर ड्यूटीवरून घरी आल्यानंतर वडील रोज खेळायचे.कधी शिवनापाणी तर कधी लपाछपी.सुट्टीच्या दिवशी बागेत भेळपूरीचा बेत.लपाछपी मध्ये वडील लवकर सापडले नाही की,मुलगी आईकडे जाऊन रडायची .मग आई मुलीला समजवायची, बाबा हरवले आहेत , थोडे थांब , मग ते स्वतहाच तुझे समोर येतील. अश्या सुखी कुटुंबातील बाबा अचानक २६ नोव्हेंबर च्या रात्री नंतर घरी आलेच नाहीत . सी.एस्.टी.स्टशन वरील अतिरेकी हल्ल्यात ते शहीद झाले. आजही त्या घरातील छोटी मुलगी बाबांच्या आठवणीने रडते,तेंव्हा आई सांगते बाबा हरवले आहेत , थोडे थांब,मग ते स्वतहाच तूझे समोर येतील....दिवसांमागून दिवस गेले ... पण बाबा काही आलेच नाहीत...अन् छोटी छकुली अजूनही, कधीही न येणा-या बाबांची वाट पाहतेय... प्रत्येक घटना समाजमनावर आपला ठसा उमटवतात...अशा १९५ शहीद व्यक्तींचे घरचे त्यांची वाट पहातयेत. आपत्ती ही कधीही सांगून येत नसते, म्हणूनच कर्त्या माणसाने प्रिय व्यक्तिंच्या सुखी जीवनाची काळजी घेणेचे पहिले कर्त्व्य आहे. आशा संकटकाळी शहीदांच्या कुटुंबियांच्या योगक्षेमासाठी भारतिय जीवन आयुर्विमा ही संस्था पुढे आली. शहिद करकरे व शहिद कामठे व इतर सर्व शहिद झालेल्याच्या कुटुंबियांना घरपोच चेक दिले. देश उभारणी बरोबर सेवा हे धेय्य असणा-या या संस्थेने सेवा करून शहिदांना श्रध्दांजली वाहीली. सततची सावधानता हीच खरी सूरक्षा व पहिले प्राधान्य सुरक्षितता हीच भेट कुटुंबातील प्रियजनांना देणे कर्त्व्य आहे. विमा घेणे ही प्रत्येकाचे पहिले काम या धावपळीच्या युगात झाले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वडील हरवण्याचे दुःख सोसणारी चिमुरडी खरेच मनाला अस्वस्थ करून गेली. तिचे वडील हरविले नाहीत तर कोत्या मनोवृत्ती, स्वार्थी राजकीय आणि सामाजीक गणिते त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे निष्काळजीपणा या सर्व गोष्टींनी तिच्या वडीलांचा बळी घेतला.
आमचे अलंकारीक शब्द किंवा सरकारी शौर्यपदके आणि सवलतींचा वर्षाव आदी तिच्या वडीलांना परत आणू शकणार नाहीत. पण चिमुरडीला किमान वडील या जगात नाहीत याची जाण येईपर्यंत तरी ते तुमच्या आमच्या मनात जीवंत राहिले पाहिजेत. मला वाटते तिच्यासाठी हिच खरी समजूत ठरेल. एखाद्या शत्रुच्याही घरातील वडीलही असे हरवू नयेत. ( हि प्रतिक्रिया लिहिताना मी खरेच अस्वस्थ झालो आहे. त्यामुळे बहुधा शब्द विस्कळीत झाले आहेत. )
Post a Comment